Advertisement

महेश धांडेवर गुन्हा

प्रजापत्र | Saturday, 29/01/2022
बातमी शेअर करा

बीड-सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट व्हायरल करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महेश धांडेवर बीड शहरात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
   हजरत टिपू सुलतान यांच्याबाबतीत रात्री महेश धांडेने फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकली. या पोस्टनंतर अनेकांनी याबाबत संताप व्यक्त करत पोस्ट टाकणार्‍या विरोधात कारवाई करावी या मागणीसाठी बीड शहर पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता.यानंतर शहानवाज खान सादत खान यांच्या फिर्यादीवरून महेश धांडे याच्याविरूद्ध कलम २९५अ, ५०५ (२) प्रमाणे शुक्रवारी रात्री उशिरा धांडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणाचा अधिक तपास एपीआय ढाकणे हे करत आहेत. दरम्यान वादग्रस्त पोस्ट टाकून समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

 

Advertisement

Advertisement