बीड-जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येपेक्षा आता कोरोनामुक्तांची संख्या वाढू लागल्यामुळे जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.शुक्रवारी (दि.२८) जिल्ह्यात कोरोनाचे नवे १५० रुग्ण सापडले असून २५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
शुक्रवारी बीड जिल्ह्यात १३८५ नमुन्यामध्ये १५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.तर यावेळी २५७ जणांनी कोरोनावर मात केली असून दोघांचा उपचारादरम्यान मात्र मृत्यु झाला आहे.आतपर्यंत बीड जिल्ह्यातील २८४९ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले असून जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर २.६७ टक्के आहे.तर कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९५.६९ टक्के झाला असून आतापर्यंत १ लाख ६८ हजार ५० जणांना कोरोणचा कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून स्पष्ट होते.दरम्यान दोन दिवसांपासून कोरोनच्या नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची वाढलेली संख्या जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे.