नेकनूर दि.२३ (वार्ताहर)-येळंबघाट येथून धारूरकडे लग्नाला जाणारा अँपेरिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. यामध्ये पाच जण जखमी झाले असून दोघांची जणांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना रविवारी (दि.२३) सकाळी येळंबघाट-धारूर रोडवर घडली.
धारूर येथे रविवारी (दि.२३) लग्न समारंभ असल्याने येळंबघाट येथील काही नागरीक एका अँपेरिक्षामध्ये बसून लग्नाला जात होते. धारूर रस्त्यावर चालकाचा ताबा सुटल्याने सदरील रिक्षा एका खड्ड्यात जावून पलटी झाला. यात लैला अख्तर शेख (वय-४०), सय्यद नुरा (वय-४५), शेख तय्यब (वय-२६), पठाण रशीदाबी (वय-७०), वहीदा शेख (वय-४५) या पाच जणांना मार लागल्याने त्यांना उपचारासाठी नेकनूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
बातमी शेअर करा