Advertisement

गांज्याला पैसे न दिल्याने वृद्ध आत्याचा दगडाने ठेचून खून

प्रजापत्र | Sunday, 23/01/2022
बातमी शेअर करा

केज - तालुक्यातील नांदूरघाट येथे शनिवारी सकाळी सखुबाई बन्सी शिंदे (वय ६०, रा. चांदणी, ता. बीड) या वृद्ध महिलेचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह सापडला होता. केज पोलिसांना या प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आले असून मयत महिलेच्या भाचा राजू उर्फ टुल्या बन्सी शिंदे यानेच तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

 

शुक्रवारी (दि.२१) सायं. ७ वाजताच्या सुमारास राजुने आत्या सखुबाईला दारू आणि गांजासाठी पैसे मागितले. सखुबाईने नकार देताच राजूने तिला मारहाण केली. त्यानंतर तिच्या गळ्यात दोरी बांधून ओढत झाडाजवळ नेले आणि तिथे दगडाने ठेचून तिचा खून केला. याप्रकरणी गोवर्धन काळे यांच्या तक्रारीवरून राजूवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. केज पोलिसांनी वेगाने तपास करत रविवारी (दि. २३) दुपारी १ वा. खर्डा (जि. अहमदनगर) येथे राजूला बेड्या ठोकल्या.

Advertisement

Advertisement