केज दि.२० – तालुक्यातील युसुफवडगाव ठाणे हद्दीतील एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी पाणी आणण्यासाठी गेली असता तिचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले आहे.
१७ जानेवारी रविवार रोजी दुपारी १२ वा. युसुफवडगाव हद्दीतील एक सोळा वर्षीय मुलगी घरातुन व्हॉल्व्ह वरून पाणी आणण्यासाठी जाते असे म्हणुन घरीहुन गेली. ती घरी परत न आल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी शोध घेतला; परंतु ती आढळून आली नाही. म्हणून तिच्या भावाने दि. १९ जानेवारी युसुफवडगाव येथील पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीने तिला अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यतिविरुद्ध गु.र.नं. १५/२०२२ भा.दं.वि. ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पिंपळे हे करीत आहेत.
बातमी शेअर करा