धारूर-एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन ठिकाणी संपा मधील दिलीप पांचाळ यांना शासन आंदोलनावर तोडगा काढत नाहीत, यामुळे मानसिक -आर्थिक ताणाने हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेहून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे हलवण्यात आले.या गोष्टीमुळे कर्मचारी यांनी प्रशासनाचा निषेध करून राग व्यक्त केला.दिलीप पांचाळ हे कामावर रुजू न झाल्यामुळे त्यांचे महिनाभरापूर्वी निलंबन करण्यात आले होते.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
धारूर आगारासमोर एसटी कर्मचारी उपोषण करत बसले होते त्या ठिकाणी श्री दिलीप मधुकर पांचाळ वाहक यांना हृदय विकाराचा सौम्य झटका आल्याने ते आंदोलनस्थळी कोसळले.यानंतर त्यांना शासकीय रुग्णालय धारूर येथे दाखल केले,परंतु त्या ठिकाणी स्थानिक डाॅक्टरांनी तात्काळ अंबाजोगाई शासकीय रुग्णालयांमध्ये पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले.हा प्रकार मानसिक ताणातून झालेला असल्याचे बोलले जात आहे.तर संपतील कर्मचारी यांनी सरकार रोष व्यक्त केला आहे.दरम्यान दोन महिन्यापासून संप चालू आहे यामुळे कर्मचाऱ्यांवर मानसिक ताण वाढला आहे त्यामध्ये आर्थिक टंचाई ही संसारामध्ये जाणवत आहे या मानसिक ताण तणावामध्ये काहीही प्रकार घडू शकतो तरी प्रशासनाने या आंदोलनावर तोडगा काढून कर्मचाऱ्याला होत असलेला मानसिक आर्थिक ताण कमी करावा नसता येणारे दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांचे काय होईल हे सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया संपातील कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
बातमी शेअर करा