Advertisement

कत्तलसाठी जाणारे ३५ बैल कंटनेरसह पकडले

प्रजापत्र | Saturday, 15/01/2022
बातमी शेअर करा

केज दि.१५ - नेकनूर येथून तामिळनाडू राज्यात कत्तल करण्यासाठी ३५ बैल घेऊन निघालेले कंटनेर केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने केज तालुक्यातील मस्साजोगजवळ ताब्यात घेतले. चौघांना अटक करीत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पथकाने १४ लाख रुपये किंमतीचे व २५ लाख रुपयांचा कंटनेर जप्त केला आहे.

 

        जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा यांना १४ जानेवारी रोजी कंटेनर हा ( के ए ५१ एएफ ९००९ ) नेकनूर येथून जनावरे भरून बेकायदेशीररित्या कत्तल करण्यासाठी तामिळनाडू राज्यात घेऊन जात आहे अशी माहिती मिळाली होती. त्यांनी सदरचा कंटेनर हा नेकनूरहुन निघाला असून तो केजमार्गे जात आहे अशी माहिती केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना दिल्याने कुमावत यांनी केज ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्यासह त्यांच्या पथकास पाठवून दिले. मस्साजोग येथे सदरचे कंटेनर १५ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास थांबवून कंटेनरची पाहणी केली असता कंटेनरमध्ये ३५ बैल मिळून आले. सदर कंटेनर चालक व मालक यांना सदर बैलाचे कागदपत्र बाबत विचारणा केली असता जवळ नसल्याचे सांगितल्याने बैल व कंटेनर ताब्यात घेऊन पोलीस ठाणे केज येथे आणून लावला. पथकाने १४ लाख रुपये किंमतीचे ३५ बैल व २५ लाख रुपये किंमतीचा कंटेनर असा ३९ लाख रुपयांचा मुद्देमाल सह पाच आरोपींना ताब्यात घेतले. जमादार बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून कंटनेर चालक दिनेश अरविंद उत्रीरकुमार ( रा. मक्कीनपंत्ती ता. पोलाची जि. कोलिंबत्तोर, राज्य तामिळनाडू ), मुबदी चन्नअप्पा धर्मराज ( रा. नरसिंग पुरम ता. पोलाची जि. कोलिंबत्तोर ), सिलेमबरसन गणपती, आर. जयकुमारा राजागम ( दोघे रा. कंबनपूर जि. टेनी राज्य तामिळनाडू ), सय्यद फेरोज सय्यद मोबिन ( रा. दर्गा कॉलनी, नेकनूर ), अतीक रशीद कुरेशी ( रा. मोमीनपुरा, बीड ) या सहा जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

 

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक आर राजा, अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक सविता वारेकर व केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष मिसळे, फौजदार मनोज कुलकर्णी, सहाय्यक फौजदार शेषराव यादव, जमादार बालाजी दराडे, सुहास जाधव, पोलिस नाईक राजू वंजारे, सचिन अहंकारे यांनी केली.

Advertisement

Advertisement