बीड दि.9 – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विस्फोट सुरू आहे. त्याचे लोण सर्वत्र पसरत असल्याचे दिसून येत आहे. बीड जिल्ह्यात आज जाहीर करण्यात आलेल्या 1410 अहवालात एकूण 32 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
यामध्ये अंबाजोगाई 02, आष्टी 00, बीड 16, धारूर 00, गेवराई 02, केज 00, माजलगाव 01, परळी 04, पाटोदा 01, शिरूर 04, वडवणी 02 इत्यादी रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आणि कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
बातमी शेअर करा