बीड-राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना आता बीड जिल्ह्यात ही कोरोनाची रुग्ण संख्या वाढली असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून आज (दि.८) समोर आले आहे.शनिवारी १७३७ नमुन्यामध्ये २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.आजचा बीड जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १. ५० टक्के झाला आहे.आजच्या अहवालात अंबाजोगाई ४,आष्टी १,बीड १०,धारूर २,गेवराई १,केज २,माजलगाव १,परळी ३,शिरूर २ रुग्ण आढळून आले.दरम्यान चार महिन्यानंतर बीड जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
बातमी शेअर करा