Advertisement

घाटनांदूरमध्ये आठ लाखांचा गुटखा पकडला

प्रजापत्र | Friday, 07/01/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई: ग्रामीण पोलीस व डीवायएसपी च्या पथकाने संयुक्त कार्यवाही करीत आठ लाख रुपयांचा गुटखा पकडल्याची घटना तालुक्यातील घाटनांदुर येथे शुक्रवारी ( दि. 7 ) दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आल्याची माहीती देण्यात आली आहे.

 

 

महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची चोरटी विक्री होत असल्याने बीड जिल्ह्यातील पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे अंबाजोगाई येथील डीवायसपी सुनील जायभाय यांच्या पथकाने घटनांदूर येथे विक्रीसाठी ठेवलेला आठ लाखाचा गुटखा ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी एका आरोपीस ताब्यात घेतले असुन अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई सतीश कंगणे, नितीन अटकरे, मेघराज राऊत, मनोज घुगे आणि विजयकुमार पवार यांनी केली

Advertisement

Advertisement