Advertisement

पाच लाखासाठी विवाहितेस घरातून हाकलून दिले

प्रजापत्र | Friday, 07/01/2022
बातमी शेअर करा

केज दि.७ - दुकान टाकण्यासाठी व चार चाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन का येत नाहीस या कारणावरून एका २२ वर्षीय विवाहित महिलेस सासरच्या लोकांनी घरातून हाकलून दिल्याप्रकरणी पतीसह सहा जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

 

 

    केज शहरातील समता नगर भागातील जकीयोद्दीन शेख यांची कन्या झेबा हिचा ३ नोव्हेंबर २०१९ रोजी समीर चाँदपाशा शेख ( रा. रेणापूर नाका एमआयडीसी रोड, इंडिया नगर, लातूर ) याच्याशी निकाह झाला होता. लग्नानंतर तिला तुझ्या पतीला दुकान टाकण्यासाठी व चार चाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून पती समीर शेख, सासू इलियास शेख, सासरे चाँदपाशा शेख, दिर परवेज शेख, फरीद शेख, जाऊ कलिमा शेख यांनी तगादा लावत शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. त्यामुळे तिच्या वडिलांनी व नातेवाईकांनी दोन लाख रुपये देऊन नांदण्यास पाठविले. पुन्हा काही दिवसांनी पैशाची मागणी करीत व चारित्र्यावर संशय घेऊन घरातून हाकलून दिले. तिला व तिच्या मुलाला पैसे घेऊन न आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद झेबा शेख यांनी दिल्यावरून वरील सासरच्या सहा लोकांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मंगेश भोले हे करत आहेत. 

Advertisement

Advertisement