सय्यद शाकेरअली
किल्लेधारूर-तालुक्यातील सोनिमोहा येथे अज्ञात प्राण्याने केलेल्या हल्ल्यात ५ वर्षीय बालकाचा मृत्यु झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि.३) समोर आली आहे.या बालकावर काल अज्ञात प्राण्याने हल्ला चढविला होता.यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला आहे.
धारुर (Dharur) तालुक्यातील सोनिमोहा येथे गावाच्या उत्तरेस असलेल्या मिरास नावाच्या शेतजमीनीत खेळत असलेल्या सहा वर्षीय बालक यशराज दत्तात्रय दराडे याच्यावर अज्ञात वन्यपशूने हल्ला केला. या हल्ल्यात यशराजच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या.वेळीच नातेवाईकांनी जखमी यशराजला अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात (SRTR) उपचारासाठी दाखल केले. मात्र रविवारी रात्री उपचार सुरु असताना बालकाचा मृत्यू झाला. बालकाचे वडिल दत्तात्रय आश्रोबा दराडे यांचा शेळी व मेंढीपालनाचा व्यवसाय असल्याचे कळते.
सदर घटना रविवारी (दि.२) सांयकाळी 5 च्या सुमारास घडली. सदरील प्रकाराबाबत धारुर पोलिस (Police), वन विभाग (Forest Department) अथवा रुग्णालयात कसलीच माहिती उपलब्ध होवू शकली नाही. बालकाच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
बातमी शेअर करा