Advertisement

आरोग्य विभागाच्या पेपरफुटीप्रकरणी आणखी एकाला अटक

प्रजापत्र | Monday, 20/12/2021
बातमी शेअर करा

पाटोदा-तालुक्यातील वडझरी येथील संजय शाहुराव सानप (वय-४०) याला आरोग्य विभागाच्या परिक्षेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.पुणे सायबर पोलीसांनी रविवारी सायंकाळी ही कारवाई केल्याची माहिती आहे. 

 

            पुणे सायबर विभागाच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे याच्या घरी धाड मारल्यानंतर पोलीसांना तब्बल दोन कोटी रुपयांचे घबाड आढळून आले. त्याच बरोबर आरोग्य सेवा गट ड परिक्षेत गैरव्यवहार करण्याात आल्याच्या आरोपात संजय शाहूराव सानप याचाही सहभाग आढळून आल्याने त्यालाही अटक करण्यात आली आहे. यापुर्वी बीडच्या अनेकांना यात अटक झालेली आहे. फसवणूक झालेल्या उमेदवारांनी पुणे सायबर विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement