Advertisement

भरधाव गाडीचे टायर फुटल्याने अपघात

प्रजापत्र | Sunday, 19/12/2021
बातमी शेअर करा

 बीड - भरधाव गाडीचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात जिज्ञासा अॅकॅडमीचे संचालक रविंद्र प्रेमराज शेळके (वय ३१, रा. वांगी) यांचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी झाल्याची घटना बाभळ खुंट्याजवळ घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होवू लागली आहे.

 

बीड येथील जिज्ञासा अॅकॅडमीचे संचालक रविंद्र शेळकेहे काल रात्री पुण्याहून बीडला आले होते. त्यानंतर बीडहून काळेगावकडे मुलांना सोडण्यासाठी जात असताना बाभळखु ट्याजवळ त्यांच्या गाडीचे टायर फुटल्याने गाड़ी पलटी झाली. या अपघातात रविंद्र शेळके गंभीररित्या जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. तर अन्य तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Advertisement

Advertisement