Advertisement

लस नाही तर दारू नाही...

प्रजापत्र | Sunday, 12/12/2021
बातमी शेअर करा

 

सोलापूर : राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे. लस घेतली नाही तर आता वेगवेगळ्या सेवा मिळणार नाहीत असं कठोर नियम काढण्यात आला आहे. औरंगाबाद पाठोपाठ आता आणखी एका जिल्ह्यात नियमावली कठोर करण्यात आली आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील पेट्रोल पंप, बँक, वाईन शॉप, मॉल्स शासकीय कार्यालयांमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश मिळतं आहे. याची काटेकोर अंमलबजावणी नकरणाऱ्या विरोधात सोलापूर महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे.लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच सेवा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेले आहेत. आत्तापर्यंत महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांकडून 04 हॉटेल,10 वाईन शॉप्स,02 पेट्रोल पंपावर कारवाई करण्यात आलेली आहे.

Advertisement

Advertisement