बीड - अॅटोमोबाईल दुकानाच्या पाठीमागील भागाचा पत्रा उचकून आतमध्ये प्रवेश करत आतील ऑईलसह इतर स्पेअर पार्टस असा एकूण सहा ते सात लाखांचा माल चोरून नेल्याची घटना रात्री घडली. सकाळी दुकानदाराला आपल्या दुकानात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यातमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
महादेव बापुराव मोरे यांचे जालना रोडवर राहुल अॅटोमोबाईलस नावाचे दुकान आहे. रात्री चोरट्याने त्यांच्या दुकानाचा पाठीमागील भागाचा पत्रा उचकून आतमध्ये प्रवेश केला. आतील इंजिनचे ऑईल व गाड्यांचे स्पेअर पार्ट असा एकूण सहा ते सात लाख रूपयांचा माल चोरून नेला. सदरील हा चोरीचा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी दुकानाचे मालक महादेव मोरे यांनी बीड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
बातमी शेअर करा