Advertisement

आरोग्य भरतीची परीक्षा नव्याने !

प्रजापत्र | Saturday, 11/12/2021
बातमी शेअर करा

बीड दि.१० (प्रतिनिधी)-राज्यात आरोग्य भरतीमागे लागलेले शुक्लकाष्ट थांबण्याचे नाव घेत नसून आरोग्य विभागाच्या परीक्षेतील पेपर फुटी प्रकरणी अनेक बडे अधिकारी पोलिसांच्या जाळयात अडकल्यानंतर आता सदर परीक्षाच रद्द करण्याच्या निर्णयावर आरोग्यविभाग आला आहे. आरोग्य विभागाने सदर परीक्षा नव्याने घेण्याचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती असून यावर मुख्यमंत्री सोमवारी निर्णय घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

 

राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ समोर आला आहे. सुरुवातीला कंपनीच्या अकार्यक्षमतेमुळे परीक्षा पुढे ढकलावी लागली होती, त्यानंतर परीक्षा झाली, मात्र प्रत्येक पदासाठी लाखोंची बोली लावली जात असल्याच्या चर्चा झाल्या होत्या आणि त्यानंतर तर पेपर फुटल्याचेच समोर आले.

 

यासाऱ्या पार्श्वभूमीवर आता सदर परीक्षाच रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आरोग्य विभागाने तसा प्रस्ताव  त्यात केला असून मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. यामुळे आता सोमवारी यावर अंतिम निर्णय होणार आहे.

Advertisement

Advertisement