Advertisement

दोन विद्यार्थी कोरोनाबाधित

प्रजापत्र | Thursday, 09/12/2021
बातमी शेअर करा

वडवणी : राज्यात शाळा सुरु करण्याच्या निर्णयानंतर आता विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत देखील खबरदारी घेतली जात आहे. येथील महाराणी ताराबाई विद्यालयातील २ विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले असून त्यानंतर प्रशासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

वडवणी या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन विद्यार्थी कोरोना पाॅझिटीव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून शाळा व्यवस्थापनाला देण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निपटे यांनी याला दुजोरा दिला. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सदर शाळा बंद करण्यात आली आहे. 

Advertisement

Advertisement