Advertisement

प्रवाशी तरुणीस धमकावून रिक्षा चालकाने लुटले

प्रजापत्र | Thursday, 09/12/2021
बातमी शेअर करा

केज दि.९- प्रवाशी तरुणीस निर्जनस्थळी नेऊन अपेरिक्षा चालकाने धमकावून तरुणीकडे असलेले ३ हजार ९०० रुपये आणि शैक्षणिक कागदपत्रे काढून घेतल्याचा प्रकार केज तालुक्यातील बोरीसावरगाव शिवारात घडली. याप्रकरणी अज्ञात अपेरिक्षा चालकाविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

 

 

     केज तालुक्यातील कुंबेफळ येथून लक्ष्मी संजय वाहवळकर ( वय २१, रा. वाघाळा ता. अंबाजोगाई ) ही तरुणी बुधवारी ( दि. ८ ) रात्री ७ वाजेच्या सुमारास वाघाळा येथे जाण्यासाठी एका अपेरिक्षामध्ये बसली होती. अपेरिक्षात इतर प्रवाशी नसल्याने अपेरिक्षा चालकाने अपेरिक्षा हा दिपेवडगाव फाट्याहून बोरीसावरगाव शिवारात निर्जनस्थळी नेला. तेथे या तरुणीस धमकावून तिच्याकडे असलेले ३ हजार ९०० रुपये आणि शैक्षणिक कागदपत्रे काढून घेत तेथून पलायन केले. अशी फिर्याद लक्ष्मी वाहवळकर यांनी दिल्यावरून अज्ञात अपेरिक्षा चालकाविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनात फौजदार रियाजोद्दीन शेख हे पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement