Advertisement

कोणत्या तालुक्यात वाढले किती गट ?

प्रजापत्र | Wednesday, 08/12/2021
बातमी शेअर करा

बीड : बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ९ सदस्य वाढणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यास संकेत राज्य सरकारने दिल्यानंतर आता कोणत्या तालुक्यात किती गट वाढणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. ती उत्सुकता आता संपली असून सामान्य प्रशासन विभागाने प्रत्येक तालुक्यातील गट आणि गण संख्या जाहीर केली आहे.

नवीन रचनेनुसार बीड जिल्हा परिषदेत ६९ गट असणार आहेत. तर प्रत्येक गटात २ पंचायत समिती गण असतात . त्यामुळे तालुक्यातील गट संख्येच्या दुप्पट संख्या त्या तालुक्यातील पंचायत समिती सदस्यांची असणार आहे. जिल्ह्यात ९ जिल्हा परिषद गट वाढले असून शिरूर आणि धारूर तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये  प्रत्येकी १ जिल्हा परिषद गट आणि २ पंचायत समिती गण वाढणार आहेत.

नव्या  रचनेनुसार आष्टी ८ , पाटोदा ४, शिरूर ४ . गेवराई १०, माजलगाव ७, वडवणी ३ , बीड ९, केज ७, धारूर ३, परळी ७ आणि अंबाजोगाई ७ असे गट असणार आहेत.

Advertisement

Advertisement