किल्लेधारूर दि.7 डिसेंबर – धारूर तालुक्यातील सारुकवाडीचे शिक्षक बालाजी मारुती हुंबाडे (वय 47) वर्षे यांचे सोमवारी अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे .
बालाजी हुंबाडे हे मागील पाच वर्षा पासून सारुकवाडी येथे सह शिक्षक म्हणून कार्यरत होते. शनिवारी ते लातुर जिल्ह्यातील त्यांच्या जिरगा गावी गेले होते. सोमवारी गावातून उदगीर येथे दुचाकी वर जात असतांना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दुचाकी व ट्रकचा अपघात होवून त्यांचा मुत्यू झाला.
सोमवारी (दि.6) रात्री उशिरा जिरगा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई असा परिवार आहे. सहशिक्षक हुंबाडे यांच्या निधनाने सारुकवाडी गावासह तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
बातमी शेअर करा