Advertisement

धारुरच्या ऊसतोड मजूराचा कर्नाटकात मृत्यू

प्रजापत्र | Tuesday, 07/12/2021
बातमी शेअर करा

धारुरच्या ऊसतोड मजूराचा कर्नाटकात मृत्यू; दुचाकीने उडवले.

 

किल्लेधारूर दि.7 डिसेंबर - धारूर तालुक्यातील बांगरवाडी येथील ऊसतोड मजूर दत्तू पंढरी नाईकवाडे (44) यांचा कर्नाटक  राज्यातील बेळगी कारखान्यावर दुचाकीच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.6) घडली. 

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की धारूर तालुक्यातील बांगरवाडी येथील दत्तू पंढरी नाईकवाडे हे ऊस तोडणीचे काम करतात. प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी ऊसतोडणीसाठी ते कर्नाटकातील बेळगी कारखान्यावर सहकुटूंब गेले होते. गावाकडे ते अल्पभुधारक शेतकरी असल्याने ऊसतोडणी करुन आपली उपजिविका भागवत.

 

काल दि.6 सोमवार रोजी कारखान्याचा ऊस तोडून गाडी काढत असताना रस्त्यावर उभे असताना दुचाकीने त्यांना उडवले. त्याना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुली एक मुलगा असा परिवार आहे. त्याचे पार्थिव सकाळी सात वाजता गावात आणण्यात आले असून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

धारुर तालुक्यातील अनेक लोक हाताला काम नसल्यामुळे ऊस तोडणीसाठी इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात. यात अशा स्वरुपाच्या अपघाती घटना समोर येत आहेत. दिवसेंदिवस ऊसतोड मजुरांचा व त्यांच्या नातलगांचा मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 

 

काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील एका मुलीचा विहिरीवर पाणी आणताना मृत्यू झाला होता. तर गांजपूर येथील एका ऊसतोड मजुरांचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. पंधरा दिवसांपुर्वीच धारुर येथील संभाजीनगरमधील राहुल पवार (वय 22 वर्ष) या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यातच आज सदरील अपघाताची घटना घडली आहे. अत्यंत गरीब कुटूंबावर दुख कोसळल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement