Advertisement

केज कळंब रोडवर पुन्हा एक अपघात

प्रजापत्र | Friday, 03/12/2021
बातमी शेअर करा

केज दि.3 – काल गुरुवारी केज कळंब रोडवरील चिंचोली फाट्या नजीक कंटेनर आणि टेम्पो च्या अपघातात चालक जखमी झाला होता. आणि आज तालुक्यातील साळेगाव येथे केज-कळंब रोडवर दि. ३ डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी १० वा. गित्ते वस्ती जवळ मोटार सायकलला एका भरधाव टेम्पोने धडक दिल्याने सहशिक्षक बाळासाहेब जोगदंड जखमी झाले आहेत.

 

                         केज येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथील सहशिक्षक बालासाहेब जोगदंड (वय ४८ वर्ष) हे साळेगाव कडून मोटारसायकल क्र. (एमएच-४४/व्ही-५२४४) वरून केजकडे जात असताना केज-कळंब रोडवरील साळेगाव येथील गित्ते वस्ती जवळ केज कडून कळंबच्या दिशेने जात असलेल्या एका भरधाव टेम्पोने क्र. (एमएच-१३/जी-२२०९) ने टेम्पो चुकीच्या दिशेने चालवून त्यांना धडक दिली. यात बालासाहेब यशवंत जोगदंड (रा. फुले नगर केज) यांच्या डोक्याला आणि खांद्याला मार लागला.

 

                  दरम्यान अपघात होताच त्या रस्त्याने जात असलेले जाणारे वसुंधरा शाळेचे सहशिक्षक दिपक उबाळे आणि त्यांचे सहकारी जनक वाघमारे यांनी त्यांच्या गाडीतून जखमी बालासाहेब जोगदंड यांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथील कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकारी डॉ. भिसे यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून संदर्भीय सेवेसाठी बीड येथे हलविले आहे.तेथे त्यांची तपासणी केली असता खांद्याचे व मनगटाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले असून प्रकृती ठीक आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अशोक गवळी हे करीत आहेत.

Advertisement

Advertisement