Advertisement

कोरोनाबळींच्या वारसांना मदतीसाठी संकेतस्थळ जाहीर

प्रजापत्र | Thursday, 02/12/2021
बातमी शेअर करा

बीड : कोरोनामुळे बळी गेलेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजाराचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने सर्वोेच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर घेतला आहे. यासाठीचा शासनादेश जारी झाल्यानंतर आता वारसांनी अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ जाहीर करण्यात आले आहे.

 

कोरेानाबळींच्या वारसांना सानुग्रह अनुदानासाठीचा अर्ज mahacovid19relif.in स्थळावर करता येणार आहे. अर्ज करताना अर्जदाराने स्वत:चा आधार क्रमांक मृत व्यक्तीचा तपशील, मयताचे मृत्यु प्रमाणपत्र आणि रुग्णालयीन कागदपत्रे सादर करणे आवश्यक असणार आहे. शासनाकडे ज्यांची कोविड बळी म्हणून नोंद झाली आहे अशांना मृत्युच्या कारणाचे वेगळे पुरावे द्यावे लागणार नसून अर्ज केल्यानंतर सात दिवसात त्याबद्दल निर्णय घेतला जाईल असे बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी म्हटले आहे.

 

Advertisement

Advertisement