Advertisement

रिवॉर्डच्या नावाखाली एकाला गंडविले

प्रजापत्र | Wednesday, 01/12/2021
बातमी शेअर करा

बीड दि.१ (प्रतिनिधी)-तुम्हाला रिवॉर्ड भेटणार आहे. त्यामुळे फोन-पे वरील घंटीला दाबून तुमचा पिन टाका असे म्हणत एका भामट्याने २० हजाराला गंडावल्याची घटना समोर आली आहे.या प्रकरणी शिवाजी नगर पोलीसात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

 

          फिर्यादीच्या मोबईलवर एका भामट्याने फोन करुन तुम्हाला रिवॉर्ड भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही फोन पे वरील घंटीला दाबा आणि तुमचा पिन टाका तुम्हाला तुमच्या खात्यावर पैसे भेटतील असे म्हटल्याने पिन टाकताच भामट्याने वीस हजार रुपये खात्यामधून गायब केले. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement