Advertisement

केज तालुक्यातील एका शेतकऱ्याची आत्महत्या

प्रजापत्र | Wednesday, 01/12/2021
बातमी शेअर करा

केज दि.30 – कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून तालुक्यातील कित्येक शेतकऱ्यांनी मागच्या दिवसांत आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यातच बँकेचे कर्ज आणि लोकांकडून हातउसने घेतलेले पैसे कसे फेडायचे ? या विचारातून एका ६५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील आरणगाव येथे घडली. दिलीप जनार्धन इतापे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

 

      आरणगाव येथील शेतकरी दिलीप जनार्धन इतापे ( वय ६५ ) यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. तसेच घर खर्चासाठी लोकांकडून हात उसने पैसे घेतले होते. अतिवृष्टीने शेतीतून अपेक्षित उत्पन्न पदरात न पडल्याने बँकेचे कर्ज व लोकांकडून घेतलेले पैसे कसे फेडायचे ? या विचारातून चिंताग्रस्त झालेल्या दिलीप इतापे यांनी टोकाची भूमिका घेतली. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी रघुनाथ इतापे यांच्या शेतातील बाभळीचे झाडास नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन दिलीप इतापे यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

 

                   दरम्यान, उत्तेश्वर दिलीप इतापे यांच्या खबरेवरून केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. फौजदार प्रदीप यादव हे पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement