Advertisement

बीड जिल्ह्यातील काँग्रेस शहराध्यक्षांच्या नियुक्त्या

प्रजापत्र | Sunday, 28/11/2021
बातमी शेअर करा

केज-बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आता नव्या जोमाने कामाला लागला असून जुने व नवे अशी मोठ बांधत पक्ष बांधणीवर चांगला जोर लावल्याचे दिसत आहे याचाच एक भाग म्हणून रविवारी केज येथे चार शहराच्या शहर अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून या शहरात मुस्लिम समाजाला प्राधान्य देत सामाजिक समतोल देखील साधला गेल्याचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी बोलताना सांगितले.

          बीड जिल्हा अध्यक्ष पदी तडफदार व उमदे नेतृत्व म्हणून खा. रजनीताई पाटील यांनी विश्वास दाखवत राजेसाहेब देशमुख यांची नियुक्ती केली आणि जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून मरगळ आलेल्या काँग्रेसला एक भरारी व चकाकी आली जिल्हाध्यक्ष बदलल्याने आता जिल्हयातील सर्व निवडी नव्याने होतील असा अंदाज आहे व त्याच पार्श्वभूमीवर रविवारी दि.२८ रोजी चार शहरांच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये

          आष्टी शहर अध्यक्ष पदी अब्दुल गणी अब्दुल करीम, शिरूर शहर अध्यक्ष पदी शेख असिफ शेख शब्बीर, पाटोदा शहर अध्यक्ष पदी शेख इम्रान शेख नूर तर केज शहर अध्यक्ष पदी ताहेर अब्दुल खालेख खुरेशी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र सबंधितांना केज येथे शिवनेरी च्या प्रांगणात देण्यात आले यावेळी माजी मंत्री अशोकराव पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा देत जिल्हयात पुन्हा काँग्रेस सर्व ताकतीने उभी करण्याचे अवाहन केले.

          यावेळी माजी मंत्री अशोक पाटील,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, आदित्य पाटील, पशुपतीनाथ दांगट, बाळासाहेब ठोंबरे, दलील इनामदार, कबीर इनामदार, अरुण गुंड, विजयकुमार भन्साळी सह इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement