Advertisement

अंबाजोगाईवरून येणारी बस फोडली

प्रजापत्र | Saturday, 27/11/2021
बातमी शेअर करा

बीडः तब्बल 23 दिवसानंतर बीड जिल्ह्यात बससेवा काही प्रमाणात सुरळीत झाल्याचे चित्र असताना अंबाजोगाईवरून येणारी बस मांजरसुंब्याजवळ अज्ञातांनी फोडल्याचे समोर आले आहे. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

 

बीडवरून अंबाजोगाईला एमएच 20 एडी बी.एल.1805 ही बस बीडवरून अंबाजोगाईला गेली होती. यानंतर अंबाजोगाईवरून ही बस परत येत असताना मांजरसुंब्याजवळ या बसवर अज्ञातांनी दगडफेक केली. यामध्ये बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विभाग नियंत्रक अजय मोरे यांनी या संदर्भात माहिती दिली असून रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Advertisement

Advertisement