Advertisement

धारूरच्या घाटाचा प्रश्न लागणार निकाली

प्रजापत्र | Friday, 26/11/2021
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.26 – केंद्रीय रस्ते वाहतुक विकास मंत्री नितीन गडकरी यांना किल्ले धारुर तेलगाव रस्त्यावरील घाट रुंदीच्या महत्त्वाच्या प्रश्नासह इतर रस्ते विकासासाठी गुरुवारी लातूर येथे भेटलेल्या शिष्टमंडळास गडकरी यांनी सकरात्मक प्रतिसाद देत तात्काळ दखल घेण्याचे आश्वासन दिले.

 

            लातूर येथे केंद्रीय रस्ते वाहतुक विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विविध रस्त्यांचा भुमिपूजन व विकास कामांचे उद्घाटन दि.25 गुरुवारी करण्यात आले. गुरुवारी रात्री ना. गडकरी यांची भेट घेण्यासाठी धारुरचे शिष्टमंडळ लातूर येथे आले होते. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री ओमप्रकाश शेटे व औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी ना. गडकरी यांची रात्री 11 वाजता शासकीय विश्रामगृहात भेट घडवून दिली. यावेळी शिष्टमंडळाने धारुर माजलगाव रस्ता (राष्ट्रीय महामार्ग क्र 548 सी) वरील घाट रुंदीकरण, लोंखडी सावरगाव ते पाडळसिंगी रस्ता व आरणवाडी साठवण तलावाजवळ सुरक्षा भिंतीचे संरक्षक कठडे करण्याबाबत गडकरी यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी औसाचे आमदार अभिमन्यू पवार उपस्थित होते. याप्रसंगी ना. गडकरी यांनी निवेदन स्विकारत निवेदनावर तातडीने निर्णय घेण्याचा शेरा देत सकरात्मक प्रतिसाद दिला.

 

यावेळी शिष्टमंडळाचे म्हणने एकून आपल्या सुचनेप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन ना. नितिन गडकरी यांनी दिले. औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष शाकेर सय्यद, जलदुत विजय शिनगारे, आडत व्यापारी संदिप शिनगारे, कायाकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष दिनेश कापसे उपस्थित होते.

 

          यावेळी केज तालुक्यातील रस्त्यावर चर्चा करण्यात आली असून देवगाव – विडा ते कासारी फाटा या राष्ट्रीय महामार्ग 548 सी ला जोडणारा रस्त्यावर 9.91 कोटी रुपये निधी टाकला आहे.तर सांगवी एकुरका मालेगाव – राजेवाडी या रस्त्यासाठी 14.48 कोटी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.

Advertisement

Advertisement