बीड २००६ मद्ये जायकवाडी प्रकल्पातून गोदावरीच्या पात्रात ३ लाख क्यूसेस वेगाने पाणी सोडण्यात आल्याने गोदाकाठच्या आणि सिंदफणाकाठच्या गावांमद्ये पुरस्तिथी निर्माण झाली होती. जिल्ह्यातील ५० हुंन अधिक गावे त्यावर्षी पुरामुळे बाधित झाली होती. त्यावेळी गोदा आणि सिंदफनकाठच्या गावांमधील संपर्काच्या पुलांची उंची वाढवणे, रास्ता दुरुस्त करणे आणि पुनर्वसनासाचे प्रस्ताव तयार करणे असे उपाय सुचवले गेले होते. तास पत्रव्यवहारही झाला होता. मात्र २-३ गावाचे अपवाद वगळता आज १४ वर्षांनंतरही गोदा आणि सिंदफनकाठच्या गावांची परस्तिती तशीच आहे.
बीड जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीकाठच्या गावांची जयकवाडीतून पाणी सुटले कि धडपड कायम वाढते. अगदी त्याच पद्धतीने सिंदफनाकाठच्या अनेक गावांची परस्तितीही तशीच असते. गोदा काठ असेल किंवा सिंदफणा काठ एका बाजूला नदी तर दुसऱ्या बाजूला ओढे, मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या ओढ्यावरील पुलांची उंची फारशी नाही. त्यामुळे गोदापात्रात पाणी वाढले कि त्याचा लोंढा ओढ्यामध्येही येतो. आणि लगेच पुलावरून पाणी वाहू लागते आणि गावाचा संपर्क तुटतो. राजापूर असेल किंवा गंगावाडी रामपुरी किंवा संडासचिंचोली केवळ गावांची नावे बदलतात पणन हेच चित्रे गोदा आणि सिंदफनकाठच्या ५० हुन गावांमद्ये कायम असते. २००६ मध्ये जायकवाडी प्रकल्पातून गोदापात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. आणि जी पुरस्तिती निर्माण झाली ती भीषण होती. पाणी निघून गेल्यानंतर गावागावांमध्ये शेतीची, घरांचे जे नुकसान झाले ते विचार करायला लावणारे होते. त्याचवेळी तत्कालीन आमदार विजयसिंह पंडित यांनीं गोदाकाठच्या गावांचे पुनर्वसन व्हावे असा प्रस्ताव दिला होता. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी गोदापरिक्रमा केल्यानंतर त्याच्या दौऱ्यातही शेतकरी आणि ग्रामस्थ रस्ते पूल आणि पुनर्वसन यांचे प्रश्न मांडले होते. या पुरळ आता १४ वर्ष पूर्ण होऊन गेली आहेत. पण या १४ वर्षांनंतरही बहुतांश गावांचा पुलांची उंची वाढवण्याचा प्रश्न सुटलेला नाही. अजूनही थोडेजरी पाणी वाढले कि गावाला विलाज=खा पडून संपर्क तुटण्याचा प्रकार सुरूच असतो. दुसरीकडे अनेक गावांच्या पुंनर्वसनाच्या हालचाली सुरु झाल्या काही ठिकाणी नवीन भूखंड देखील प्रस्थापित करण्यात आले. पण एकतर गावकरी आपलं जून गाव सोडायला तयार नाहीत आणि प्रशासनालाही जायकवाडी धरण भरू लागल्याशिवाय गोदा आणि सिंदफणा काठाच्या गावांची आठवण येत नाही. त्यामुळे १४ वर्षांनंतरही या गावांना पुराची आणि नुकसानीची भीती कायम आहे.
बातमी शेअर करा