केज दि.21 – तालुक्यातील धनेगाव येथे माहेरी असलेल्या विवाहितेस एकाने कारमध्ये बळजबरीने बसवून हावरगाव येथील शेतात जबरदस्तीने ठेवल्या प्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील धनेगाव येथे एक महिला माहेरी होती. परंतु दि.१६ रोजी १० च्या सुमारास सचिन संजय पवार हा धनेगाव येथे आला व पांढऱ्या रंगाच्या गाडीत तिस बळजबरीने बसवून घेऊन गेला व हावरगाव (ता.कळंब) येथील त्याच्या मोकळ्या शेतात जबरदस्तीने ठेवले.
सदर महिलेच्या तक्रारीवरून सचिन पवार विरुद्ध युसुफ वडगाव पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक श्री.पिंपळे हे करत आहेत.
बातमी शेअर करा