Advertisement

पाठलाग करून पकडले ७५ हजार लिटर बायोडिझेल

प्रजापत्र | Friday, 19/11/2021
बातमी शेअर करा

केज-जिल्ह्यात तेहतीस लाख रुपयांच्या अवैध गुटख्यावर शिसेनेच्या जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर कारवाईचे प्रकरण ताजे असतानाच आज सुमारे एक कोटी रूपयांपेक्षा अधिक रक्कमेचे बोगस बायोडिझेल पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. अवैध धंद्यांच्याविरुद्ध या दोन्ही कारवायां सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने केल्या. 

 

     १८ नोव्हेंबर रोजी सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांना एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, मुंबई व पुणे येथून बायोडिझेल घेऊन जाणारे चार टँकर हे केजमार्गे नांदेडकडे जात आहेत. यावरून कुमावत यांनी दि. १८ नोव्हेंबर रोजी रात्री ९:३० वाजता मस्साजोग येथे पथकामार्फत सापळा लावला. त्यावेळी त्यांना एक टँकर आढळून आले. कुमावत यांनी टँकरचा पाटलाग करून ड्रायव्हरला ताब्यात घेतले. अधिक विचारपूस केली असता चालकाने टँकरमधील बायोडिझेल नांदेड येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. 

 

     तसेच चालकाकडून मिळालेल्या माहितीवरून कुमावत यांनी पथकासह थेट नांदेड व लोहा गाठले. नांदेड येथून पथकाने चार टँकर (एमएच४६/जे इ ११०६), (एमएच-०४/ जीएफ-९८७३), (एमएच-२६/एच-८४९६), एक स्कॉर्पिओ (एमएच-२१/एएक्स-१३५६) ,एक कार (एमएच-२६/टी-९९९९) ताब्यात घेतले. यावेळी तीन टँकर्समध्ये प्रत्येकी २५ हजार लिटर असे सुमारे ७५ हजार लिटर्स बायोडिझेल आढळून आले. याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई केज उपविभागीय पोलिस पथकातील बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, विकास चोपणे, सचिन अहंकारे, महादेव सातपुते, राजू वंजारे, सुहास जाधव यांच्यासह परळी पोलीस स्टेशनचे भास्कर केंद्रे, गोविंद भताने, विष्णू फड आणि किशोर घटमल यांनी केली.

 

Advertisement

Advertisement