बीड : राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी देखील आता घाई सुरु झाली आहे. राज्य सरकारने नगरपालिकांची सदस्य संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला होता, मात्र नेमके किती नगरसेवक वाढणार हे स्पष्ट केले नव्हते, त्यामुळे प्रभाग रचना रखडली होती. आता अ आणि ब वर्ग नारपालिकेत २ तर क वर्ग नगरपालिकेत ३ नगरसेवक वाढविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बीड, परळी आणि अंबाजोगाई नगरपालिकांमध्ये प्रत्येकी २ तर धारूर, माजलगाव आणि गेवराई नगरपालिकेत ३ नगरसेवक वाढणार आहेत. या वाढीव संख्येनुसार तातडीने कच्ची प्रभागरचना करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
बातमी शेअर करा