अंबाजोगाई-तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन विवाहितेवर सहा महिन्यात ४०० जणांनी बलात्कार केल्याची माहिती बाल कल्याण समिती अध्यक्ष डॉ.अभय वनवे यांनी दिली होती.याप्रकरणात अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत ९ जणांना अटक केली असून शुक्रवारी (दि.१९) आणखी एका महिला दलाला आंटीला ताब्यात घेतले.
अंबाजोगाई तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन विवाहितेवरील अत्याचाराने राज्यभर खळबळ उडाली असून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस यातील आरोपींना अटक करण्यासाठी मोठे परिश्रम घेत आहे.शुक्रवारी (दि.१९) या प्रकरणातील दलाल आंटीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणात एकूण दोन महिला व आठ पुरुषांना आतापर्यंत अटक केल्याची माहिती आहे. या प्रकरणातील अगोदरच्या सहा आरोपींना जिल्हा न्यायाधीश २ तथा अप्पर सत्र न्यायाधीश व्हि.के.मांडे यांच्यासमोर हजर केले असता १९ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आली होती.त्यामुळे आज अगोदरच्या सहा आरोपीसह नवीन महिलेला न्यायालयात हजर केले. पोलिसांनी पुढील तपासासाठी आणखी पोलीस कोठडीची मागणी केली असता न्यायाधीश एम.बी पटवारी जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश तीन यांनी सर्व आरोपींना २३ नोव्हेंबरपर्यंत (चार) दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.या गुन्हयाचा तपास अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर-पवार हे करीत आहेत.