Advertisement

'त्या' अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आणखी एकाला अटक

प्रजापत्र | Wednesday, 17/11/2021
बातमी शेअर करा

अंबाजोगाई-तालुक्यातील एका अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली असून अंबाजोगाई पोलीस या प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करून अटक करत आहेत.बुधवारी (दि.१७) पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या आणखी एकाला अटक केली असून आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

                पीडितेला जेवायला देतो म्हणून आडस रोडला मोकळ्या जागेत घेऊन जात तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आला.आरोपी ज्ञानदीप अँकडमीमध्ये असून काही दिवसापूर्वी जेवण देण्याच्या नावाखाली पीडितेला दोघांनी आडस रोडवर घेऊन जात तिचे शारीरिक शोषण केले.पोलिसांनी यातील एकाला धारूर तालुक्यातून अटक केली असून जिल्हा न्यायाधीश २ तथा अप्पर सत्र न्यायाधीश व्ही.के.मांडे यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.या गुन्हयाचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर या करत असून आतापर्यंत या गुन्हयात पंधरा आरोपी निष्पन्न झाले आहेत.तर नऊ आरोपीला अटक करण्यात पोलीसांना यश आले असून पुढील तपास सुरु आहे.

Advertisement

Advertisement