Advertisement

कोरोनाग्रस्तांसाठी सीटीस्कॅनचे दर कमी केल्याची आरोग्यमंत्र्यांची घोषणा.

प्रजापत्र | Friday, 25/09/2020
बातमी शेअर करा

गोंदिया : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या  पार्श्वभूमीवर कोरोना निदानासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या सिटीस्कॅनच्या दरांमध्ये सामान्यांना दिलासा देणारी घोषणा राज्य सरकारने केली आहे. राज्यात कोरोनासंदर्भातील 'एचआरसिटी' च्या दरांवर  दोन ते अडीच हजाराची मर्यादा घालण्यात आली असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली .
राज्यात सध्या कोरोनाचे निदान करण्यासाठी किंवा प्रादुर्भाव नेमका किती आहे हे पाहण्यासाठी सिटीस्कॅन केले जात आहे. मात्र त्याचे दर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगेळे आहेत. यासतघी अगदी ४ ते ८ हजारांपर्यंत शुल्क आकारले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता सिटीस्कॅन साठी दोन ते अडीच हजारापेक्षा जास्त दर आकारले जाणार नाहीत अशी घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सामान्यांना अडचण होऊ नये यासाठी हे दर निश्चित करण्यात आले असून तशी अधिसूचना काढण्यात आल्याचे टोपे म्हणाले. 

Advertisement

Advertisement