Advertisement

अल्पवयीन मुलीची आत्महत्या

प्रजापत्र | Tuesday, 16/11/2021
बातमी शेअर करा

वडवणी दि.१६ – तालुक्यातील उपळी येथील ज्योती अशोक इंगोले वय १६ वर्ष रा. उपळी ता.वडवणी जि.बीड या अल्पवयीन मुलीने घरी कुणी नसताना घरातील आडुला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तर त्याच गावातील एका 17 वर्षीय मुलीला पळवून नेल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

 

      आत्महत्या केलेल्या मुलीचे आई-वडील ऊसतोडणीसाठी परगावी गेले आहेत. मुलगी आजीकडे वास्तव्यास होती. सदरील मुलीच्या आत्महतेचे खरे कारण काय अद्यापही समजलेले नसून पोलीस तपास करत आहेत.

 

                 तर दुसऱ्या घटनेत याच गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी सायंकाळी शौचालयला जाते म्हणून घराबाहेर पडली होती. गावातीलच प्रदीप केशव पवार वय २४ वर्ष रा. उपळी ता.वडवणी जि. बीड या तरुणाने आपल्या दोन साथीदाराच्या मदतीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. सदरील मुलीचे वडील कारखान्याला गेले असल्याचा फायदा या तरुणांनी घेतला आहे. सदरील या घटनेने गावांमध्ये खळबळ उडाली आहे. सदरील मुलीला गाडीमध्ये बसवून पळवून नेत असताना मुलीच्या आत्याने स्वतः पाहिले असल्याने ही घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीच्या आजीच्या फिर्यादीवरून वडवणी पोलीस ठाण्यात गुरन.२३१/ २०२१ कलम ३६३,३४ भादवी गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती वडवणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मिरकर यांनी सोमवारी दिनांक १५ नोव्हेंबर रोजी दिली असून घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी करत आहे

Advertisement

Advertisement