Advertisement

धारूरच्या घाटात पुन्हा टेम्पो पलटी

प्रजापत्र | Saturday, 13/11/2021
बातमी शेअर करा

किल्लेधारूर-धारुरचा अरुंद घाटातील अपघाताची मालिका अजूनही सुरूच असून शनिवारी (दि.१३) पहाटे एक कांदा घेऊन जाणारा टेम्पो या घाटात पलटी झाला आहे.या अपघातात चालक आणि वाहक जखमी झाले असून घाटातील रुंदीकरणाचा प्रश्न कधी मिटणार ? असा सवाल वाहनधारकांमधून उपस्थित केला जाऊ लागला आहे. 

 

 

     धारुरच्या घाटात शनिवारी (दि.१३) पहाटे सोलापूरहुन कांदा घेऊन जाणारा ट्रक टेम्पो क्रमांक (एम.एच.४ डी.एस ९२१७) पलटी झाला.अरुंद रस्त्यामुळे या ठिकाणी अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे.शनिवारच्या अपघातात सुदैवानी कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी यापूर्वी या घाटात अनेकांचा अपघातात मृत्यु झाला आहे.घाटाचे रुंदीकरण झाल्यास अपघाताची मालिका थांबेल मात्र लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वाहनधारकांचा आरोप आहे.

Advertisement

Advertisement