Advertisement

आर्थिक विवंचनेतून एकाची आत्महत्या

प्रजापत्र | Thursday, 11/11/2021
बातमी शेअर करा

केज दि.११ – हाताला कामधंदा नसल्याने आर्थिक विवंचनेतून एका ३६ वर्षीय ट्रक चालकाने आपल्या राहत्या घरात पत्र्याच्या लोखंडी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील येवता येथे घडली. वैजनाथ बापूराव मोरे असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे.

 

     येवता येथील वैजनाथ बापूराव मोरे ( वय ३६ ) हे पुण्याला ट्रकवर चालक म्हणून काम करीत होते. कोरोना आजाराच्या लॉकडाऊनच्या काळात ते गावी आले. दोन ते अडीच वर्षांपासून गावी असल्याने जवळ असलेल्या पैशावर त्यांनी गुजराण केली. मात्र नंतर हाताला कामधंदा नसल्याने आर्थिक चणचण निर्माण झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा ? या विवंचनेतून त्यांनी टोकाची भूमिका घेतली. १० नोव्हेंबर रोजी सकाळी घरी कोणी नसताना वैजनाथ मोरे यांनी राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी आडूला दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच विडा बिटचे जमादार उमेश आघाव, पोलीस नाईक बाळू सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. मनोहर बापूराव मोरे यांच्या खबरेवरून केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement