Advertisement

केज कळंब रोडवर मोठा अपघात

प्रजापत्र | Wednesday, 10/11/2021
बातमी शेअर करा

केज दि.१० - केज पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या केज कळंब रोडवरील चिंचोली फाट्यानाजीक बलेनो आणि मोटारसायकल च्या अपघातात दोघे जागीच ठार झाल्याचे वृत्त आहे.

 

           सदरील अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसून दोन पुरुष जागीच ठार झाले आहेत. तर एक महिला आणि एक लहान लेकरू गंभीर जखमी आहेत. सदरील घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना दवाखान्यात हलवले असून 108 चे पायलट मकरंद घुले तसेच श्री. बारगजे हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते.

Advertisement

Advertisement