Advertisement

बस चालकाचा आत्महत्याच प्रयत्न

प्रजापत्र | Sunday, 07/11/2021
बातमी शेअर करा

बीड-एसटी कर्मचाऱ्यांनी विलनीकराच्या मागण्यावर बेमुदत संप पुकारला असून बीड जिल्ह्यात या आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा मिळत असताना बीड बस स्थानकात एका बस चालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्याचॅन प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार सायंकाळी ७ च्या सुमारास समोर आला आहे. 

                  अमोल कोकटवाड असे त्या कर्मचाऱ्याचे नाव असून एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मंजूर होत नसल्याने आज सायंकाळी ७ च्या सुमारास बस स्थानकात सुरु असलेल्या आंदोलन स्थळी  अमोल कोकटवाड यांनी रोगर औषध प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केला.दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून त्यांना उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement