Advertisement

जिल्ह्यातील सोयाबिनच्या अग्रीम पीक विमा वितरणास सुरुवात

प्रजापत्र | Sunday, 31/10/2021
बातमी शेअर करा

बीड -जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या मदतीपाठोपाठ आता भारतीय पीकविमा कंपनी कडूनही दिलासा मिळत असून, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आल्याचे दिसत आहे. बीड जिल्ह्यातील सोयाबिनच्या संभाव्य नुकसानीच्या अग्रीम (आगाऊ) २५% विमा रक्कमेच्या पोटी विमा कंपनीने १५०. ९० कोटी रुपये मंजूर केले असून शेतकऱ्यांच्या संलग्न खात्यात वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

बीड जिल्ह्यात जुलै महिन्यात अनेक महसुली मंडळांमध्ये पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन पिकाचे वाढीच्या काळात नुकसान झाले होते. त्यानुसार जिल्हा नियोजनाच्या बैठकीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अग्रीम २५ % मदतीचा प्रस्ताव विमा कंपनीला पाठवण्याबाबत जिल्हा प्रशासनास निर्देश दिले होते.त्याप्रमाणे जिल्हाधिकारी श्री राधाबिनोद शर्मा यांनी 25% अग्रीम चा प्रस्ताव पाठवून विमा कंपनीला तो प्रस्ताव मंजूर करण्याबाबत निर्देशित केले होते. बीड जिल्ह्यासाठी सोयाबीन अग्रीम अंतर्गत एकूण 4 लाख 58 हजार शेतकऱ्यांना 150 कोटी 93 लाख 69 हजार रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली असून संबंधित महसुली मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वर्ग केल्या जात आहेत.

Advertisement

Advertisement