केज-बीड तालुक्यातील सफेपुर गावातील ऊसतोड मजूर बाळासाहेब सोपान घोडके (वय-४०) यांचा केजच्या - शिक्षक कॉलनीतील एका बिल्डींगमध्ये मृतदेह आढळून आला आहे.
केजमधील शिक्षक कॉलनीतील मुकादम आणि बिल्डिंग मालक जिवराज हांगे याच्या बिल्डींगमधल्या एका बंद रूममध्ये हा मृतदेह आढळून आला आहे. सदरील मजुराची पत्नी ही पुढे एका कारखान्यावर गेली होती. त्यामुळे सदर महिला परत आल्यानंतर रूम मध्ये जाऊन पोलिसांनी पाहणी केली असता सदर व्यक्ती मृत झाल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच केज पोलिस स्टेशन चे पी. एस. आय प्रमोद यादव, सफौ महादेव गुजर, मंगेश भोले, अहंकारे हे घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून प्रेत केजच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले.दरम्यान पीएम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला हे स्पष्ट होणार असून त्यानुसार गुन्हा दाखल होईल.