शिरूर कासार दि.२८ (वार्ताहर)-ट्रॅक्टरच्या हेडवर बसून शेताकडे जात असताना अचानक आई आणि दिड वर्षाचा चिमुकला खाली पडले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मातेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर दिड वर्षाच्या मुलाची मृत्यूशी झुंज सुरू आहे. ही घटना गुरुवारी (दि.२८) सकाळी शिरूर कासार तालुक्यातील निमगाव येथे घडली.
शिरूर कासार तालुक्यातील निमगाव येथील अयोध्या दादासाहेब गांजले (वय-२५) या आपल्या दिड वर्षाच्या मुलासह गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घराकडून ट्रॅक्टर हेडवर बसून शेतात जात होत्या. गावातील मंदिराजवळ अचानक दोघे माय-लेक हेडवरून खाली पडले. यामध्ये दोघेही गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आयोध्या गांजले यांचा मृत्यू झाला तर त्यांचा दिड वर्षाचा मुलगा मृत्यूशी झुंज देत असल्याचे सुत्रांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेने निमगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रजापत्र | Thursday, 28/10/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा