Advertisement

धारूरमध्ये डेंग्यूचा बळी

प्रजापत्र | Wednesday, 27/10/2021
बातमी शेअर करा

किल्लेधारूर-शहरातील युवा पत्रकार अतूल शिनगारे यांचे ज्येष्ठ बंधू व युवा हॉटेल व्यवासायिक अनिल सर्जेराव शिनगारे (वय-४५) यांचे  अंबाजोगाई  येथे डेंग्यूवर उपचार सुरु असताना निधन झाले. शिनगारे कुटूंबियांवर ओढावलेल्या दुर्दैवी प्रसंगामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
             धारुर शहरात गेल्या वर्षभरापासून डेंग्यू आजाराची साथ सुरु आहे. कसबा विभागात डेंग्यूचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण आजही सुरुच आहे. याभागातील नागरीकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे डेंग्यू साथीवर नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. पत्रकार अतुल शिनगारे यांनी याबाबत आपल्या लेखणीतून अनेक वेळा आवाज उठवला. डेंग्यू मुळे याभागात मृत्यू झाल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. काही महिन्यापुर्वीच डेंग्यूमुळे एका महाविद्यालयीन युवकाला आपला जीव गमवावा लागला होता.या भागात राहणारे अनिल शिनगारे  (वय ४५) या हॉटेल व्यवसायिक असलेल्या पत्रकार अतुल शिनगारे यांचे ज्येष्ठ बंधूना चार दिवसांपुर्वी डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. अंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असताना आज बुधवारी (दि.२७) दुपारी अडिच वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. बुधवारी (दि.२७) सांयकाळी धारुर येथील स्मशानभुमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सतत हसतमुख असणारे आणि शांत स्वभावाच्या अनिल यांचा मोठा मित्र परिवार आहे. त्यांच्या पश्चात आई वडील, तीन भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वस्तरातून दुःख व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement