Advertisement

जिल्ह्यातील शाळांना सुट्या जाहीर

प्रजापत्र | Wednesday, 27/10/2021
बातमी शेअर करा

बीड जिल्ह्यात पाचवी ते बारावीच्या शाळा अन महाविद्यालय ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झाले.अद्याप पहिली ते चौथी च्या शाळा सुरू झालेल्या नाहीत.

दरम्यान जिल्ह्यातील शाळांना दिवाळीच्या सुट्या मिळणार की नाही,किती दिवसांच्या मिळणार याबाबत शिक्षक,पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये उत्सुकता होती .आसपासच्या जिल्ह्यात एकवीस दिवसाच्या सुट्या देण्यात आल्या आहेत.मात्र बीड जिल्हा परिषदेने याबाबत अद्याप निर्णय न घेतल्याने शिक्षक वर्ग हैराण झाला होता.

दरम्यान आता एक ते एकवीस नोव्हेंबर दरम्यान शाळांना सुट्या मिळणार आहेत.या दरम्यान 11 आणि 12 तारखेला राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा असल्याने ज्या शाळांचा यात सहभाग असेल त्या शाळांना दोन दिवस सुट्टी नसेल,उर्वरित सर्व शाळा या एकवीस दिवस बंद असतील.

याबाबतचे शिक्षण विभागाचे पत्र तयार झालेय मात्र त्यावर अद्याप शिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी झालेली नसल्याने आज संध्याकाळ पर्यंत हे पत्र सर्व शाळांना वितरित होईल .त्यामुळे इतर जिल्ह्याप्रमाणे बीफ जिल्ह्यातील शाळांना देखील 21 दिवस दिवाळीची सुट्टी असणार आहे .

 

 

 

 

Advertisement

Advertisement