Advertisement

धारुर घाटात तेलाचे टँकर पलटी

प्रजापत्र | Wednesday, 27/10/2021
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.27 अॉक्टोंबर  - आज बुधवारी (दि.27) पहाटे लातूरहून जालन्याकडे तेल घेवून जाणारे टँकर  धारुर घाटातील एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात कसलीही हानी झालेली नाही परंतु यामुळे वाहतूक खोळंबली आहे.

राष्ट्रीय महामार्ग  क्र 548 सी वरील धारूर  माजलगाव रस्त्यावर अवघड घाट   आहे. मात्र अरूंद रस्ता असल्याने या घाटात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिन्यात सोलापूर कडून सिंमेट भरून परभणी कडे जाणारे ट्रक क्र. एम. एच. 12 एन.एक्स. 4090 हे अवघड वळणावर कठडा तोडून खोल दरीत जवळजवळ दोनशे मीटर खोल कोसळला होता. या अपघातात गाडीचा चालक  जागीच ठार झाल्याची घटना घडली होती. यासोबतच सलग दोन दिवस साखर वाहतूक करणाऱ्या  वाहनांचे अपघात झाले होते.

आज बुधवार (दि.27) रोजी पहाटेच्या सुमारास धारुर घाटात पुन्हा अपघात घडला आहे. तेल घेवून जाणारा टँकर  (क्र. एम.एच. 04- एफयू 8056) पलटी होवून अपघात घडला. या अपघातात जिवित हानी झालेली नाही. मात्र घाट रस्त्यावर तेल पडल्यामुळे वाहतूक खोळंबली. यापूर्वीही या रस्त्यावर मळी पडल्याने वाहतूक व्यवस्था खोळंबली होती. या अपघातामुळे घाट रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत येत आहे.

सतत होत असलेल्या अपघातामुळे धारुर घाट  मृत्युचा सापळा बनत आहे. घाट रुंदीकरण लवकरात लवकर करण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे. अपघातस्थळी धारूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरिक्षक   नितीन पाटील यांनी भेट दिली. तेल पडल्यामुळे खोळंबलेली वाहतूक हळूहळू एका बाजूने पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Advertisement

Advertisement