Advertisement

आष्टी तहसिलदार पदी विनोद गुंडमवार 

प्रजापत्र | Monday, 25/10/2021
बातमी शेअर करा

आष्टी(प्रतिनिधी)-देगलूर जि.नांदेड येथून आष्टी येथील तहसिलदार पदी आलेले विनोद गुंडमवार यांनी आज सोमवार दि.25 रोजी आष्टी तहसिलदार पदाचा पदभार स्वीकारला आहे.

             गेल्या पंधरा दिवसापासून तहसिलदार पद रिक्त असल्याने या जागेवर देगलूर येथील नायब तहसिलदार मिनोद गुंड्डमवार यांची नियुक्ती झाली होती.परंतु बदली हूनही कर्तव्यावर रूजू न झाल्याने येथील तहसिलदार पदाचा पदभार नायब तहसिलदार बळवंत मोरे यांना देण्यात आला होता.आज सोमवार दि.25 रोजी आष्टी तहसिलदार पदी मिनोद गुंड्डमवार यांनी आष्टी तहसिलदार पदाचा पदभार स्वीकारला आहे.आष्टी तालुक्याचे नाव आम्ही खुप दिवसापासून ऐकून होतोत आज येथे काम करण्याची संधी मिळाली आहे.येत्या काळात आष्टी तहसिलमध्ये सर्वसामान्यांचे कामे प्रधान्याने सोडविणिर असून,मला भेटण्यासाठी चिठ्ठी पध्दत नसून कायम स्वरूपी कामात राहणार असल्याचेही तहसिलदार गुंड्डमवार यांनी सांगीतले.

Advertisement

Advertisement