Advertisement

राष्ट्रवादीच्या बैठकीत देवस्थान जमीन घोटाळयाची चर्चा,स्वतः पवार म्हणाले 'प्रकरण गंभीर' ?

प्रजापत्र | Sunday, 24/10/2021
बातमी शेअर करा

बीड- बीड जिल्ह्यातील देवस्थान जमीन घोटाळा सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय झाला आहे. यात दोन बडया अधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आले आहे. मात्र इतक्यावरच हे प्रकरण थांबणार नसून याचे धागेदोरे आणखी लांब असल्याची चर्चा आहे. त्यातच आता मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैबैठकीतही या जमीन घोटाळयाची चर्चा झाली असून स्वतः शरद पवारांनी हे प्रकरण गंभीर असुन सविस्तर चौकशीची गरज असल्याचे म्हटल्याची सुत्रांची माहिती आहे.
          बीड जिल्ह्यात देवस्थान आणि दर्ग्याच्या जमिनी खालसा करुन विकणारी मोठी टोळी कार्यरत आहे. अनेक देवस्थानच्या जमीनी अधिकाऱ्यांना हाताशी धरुन खालसा करण्यात आल्या आहेत. यातीलच आष्टी तालुक्यातील दोन प्रकरणात पोलीसात गुन्हे दाखल झाले आहेत. यात सध्या काही बडे अधिकारी आरोपी आहेत, मात्र या प्रकरणाचे धागेदोरे आणखी दूर असल्याची चर्चा आहे.
सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी या संदर्भात मंत्रालयात अनेक तक्रारी केल्या आहेत. तसेच आ.बाळासाहेब आजबे यांनी देखील पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली होती. दरम्यान दोन दिवसांपूर्वी मुंबई शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक बैठक घेतली. विशेष म्हणजे या बैठकीत  स्वतः शरद पवारांनी या जमीन घोटाळयाची माहिती घेतली असून सदर प्रकरण गंभीर असल्याचे म्हटल्याची सुत्रांची माहिती आहे. स्वतः शरद पवारांनीच हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटल्याने आता या प्रकरणाची चौकशी किती खोलवर जाते याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

 

एसपींच्या कार्यपध्दतीवर नाराजी
राष्ट्रवादीच्या जमिन घोटाळयावर चर्चा सुरु असतानाच पोलीसांच्या कार्यशैलीवर देखिल बैठकित चर्चा झाल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पोलीस अधिक्षकांच्या कार्यशैलीबद्दल शरद पवारांसमोरच तक्रारिंचा पाढा वाचला. यावर शरद पवारांनी देखील एसपींच्या कार्यशैलीबद्दलबद्दल नकारात्मक सुर लावल्याचे सुत्रांचे म्हणने आहे.

 

Advertisement

Advertisement