Advertisement

राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Saturday, 23/10/2021
बातमी शेअर करा

 

मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. राज ठाकरेंना बरं वाटत नसल्यामुळे मुंबईत होणारा मनसे कार्यकर्ता मेळावा पुढे ढकलण्यात आला होता. मात्र, आता राज ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. राज ठाकरेंना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. त्यांना ताप देखील आल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी आणि त्यांच्या मातोश्रींनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, त्यानंतर देखील त्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे. पालिकेकडून राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर सॅनिटायझेशन केलं जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर घरीच क्वारंटाईन होऊन उपचार केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

         राज ठाकरेंच्या मातोश्रींनी आज सकाळीच लीलावती रुग्णालयाला भेट दिली होती. यानंतर त्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या आई या दोघांना कोरोनाचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या कुटुंबातील किंवा घरातील इतर सदस्यांच्या चाचणीविषयी किंवा त्यांच्या अहवालांविषयी अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, राज ठाकरे आणि त्यांच्या आईंना कोरोनाची लागण झाली असून इतर सदस्यांपासून त्यांनी घरातच विलगीकरण करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

Advertisement